नवी दिल्लीः खासदार क्रीडा महोत्सव हे देशातील क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडू शोधण्याचे आणि खेळाडूवृत्ती बळकट करण्याचे एक उत्तम माध्यम आहे, अशा उपक्रमांमुळे केवळ तरुणांना खेळाची ओढ लागत नाही, तर त्यांच्यात शिस्त, सांघिक कार्य आणि निकोप स्पर्धेची भावना विकसित होते,” असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या खासदार खेळ महोत्सवाच्या कार्यक्रमात ते दूरदृष्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. याप्रसंगी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसख मांडविया यांची देखील “अनेकदा ग्रामीण भागात आणि छोट्या शहरांमध्ये मोठी प्रतिभा दडलेली असते, परंतु त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही, खासदार क्रीडा महोत्सवासारख्या स्पर्धांमुळे अशा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी मिळते. येथूनच उद्याचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व ऑलम्पिक स्तरावर चमकणारे खेळाडू तयार होतील असे मत त्यांनी मांडले.
खेळातून व्यक्तिमत्व विकास घडून येते, खेळाकडे केवळ यश अपयश या पलीकडे जाऊन पाहणे
विकसित भारत उभारणीत खेळाचे अत्यंत महत्त्व
‘विकसित भारत’ या संकल्पनेत खेळांचे महत्त्व अधोरेखित करताना प्रधानमंत्री म्हणाले की, देशात क्रीडा संस्कृती जितकी मजबूत होईल व जोपासली जाईल, तितकाच देशाचा पाया मजबूत होईल, अशा स्पर्धांमुळे देशात एक सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि जागतिक क्रीडा नकाशावर भारताचे नाव होईल.






