Homeभारत देश15वी राष्ट्रीय अजिंक्यपद मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेत देशातील 350 खेळाडूंचा सहभाग

15वी राष्ट्रीय अजिंक्यपद मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेत देशातील 350 खेळाडूंचा सहभाग

जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मॉन्टेक्स बॉल क्रिकेट असोसिएशन व राष्ट्रीय मॉन्टेक्स बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथील दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालय यवतमाळ येथे 15वी राष्ट्रीय अजिंक्यपद मॉन्टेक्स बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप 2025-26 चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून जम्मू कश्मीर, बिहार, छत्तीसगड तेलंगाना, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र इत्यादी राज्यांचे संघातील 350 खेळाडू उपरोक्त राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग झालेले होते, सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून मोंटेक्स बोल क्रिकेट फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव श्री दुलीचंद मेश्राम सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चाकाटे सर, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सूर्यवंशी सर, आयोजन समितीचे जिल्हा सचिव श्री विकास शेळके, विविध राज्यांचे राज्य सचिव तथा अध्यक्ष स्पर्धेला उपस्थित होते, विजेते सर्व खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन अतिथी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, अनेक उत्कृष्ट खेळाडूंची निवड थायलंड येथे होणाऱ्या एशियाई मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे, स्पर्धेचे संचालन नरेश बोहरे यांनी केले, प्रास्ताविक राष्ट्रीय महासचिव दुलीचंद मेश्राम यांनी केले तर आभार विकास शेळके यांनी मानले.

वरिष्ठ संघातील उपविजेता बिहार संघ सोबत मान्यवर अतिथी राष्ट्रीय महासचिव दुलिचंद मेश्राम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री चाकाटे सर, प्राचार्य श्री सूर्यवंशी सर

RELATED ARTICLES

Most Popular