Homeभारत देशसंस्कार शाळेचा संघ राष्ट्रीय मोंटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर विजेते

संस्कार शाळेचा संघ राष्ट्रीय मोंटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर विजेते

जिल्हा प्रतिनिधी गोंदिया: महाराष्ट्र राज्य मौंटेक्स बॉल क्रिकेट असोसिएशन व राष्ट्रीय मॉन्टेक्स बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथील गाते शारीरिक शिक्षण महाविद्यालय यवतमाळ येथे पंधरावी राष्ट्रीय अजिंक्यपद मॉन्टेक्स बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप 2025 26 चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून जम्मू कश्मीर, बिहार, छत्तीसगड तेलंगाना, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र इत्यादी राज्यांचे संघ सहभागी झाले होते, या स्पर्धेमध्ये संस्कार स्कूल गोंदिया येथील विद्यार्थी 17 वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून द्वितीय क्रमांक (सिल्वर मेडल) संपादन केले आहे. 17 वर्षाखालील महाराष्ट्राच्या संघात वन्स जांभुळकर, अर्पित डोंगरे, अंश चिकलोंढे, अंश गजभिये, चित्रांस सहारे, सार्थक बोंबार्डे, यश मानकर, आयुष गेडाम व प्रियांशू चौरे इत्यादी खेळाडूंचा समावेश आहे, या खेळाडूंनी उपरोक्त राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन महाराष्ट्र राज्य करिता सिल्वर मेडल प्राप्त केले आहेत, भविष्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेकरिता त्यांची निवड होणार आहे, विजेत्या सर्व खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी भोजराज चौधरी, राज्य क्रीडा संघटक दुलिचंद मेश्राम, संस्कार शाळेचे संचालक मधु बनसोड, सतीश बनसोड, मुख्याध्यापिका जयश्री फुले, कल्पना पाठक, क्रीडा शिक्षिका कुसुम पटले इत्यादींनी त्यांची अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

Most Popular