रायपूर: क्रीडा मंत्रालय भारत सरकार मान्यताप्राप्त स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया (SGFI) द्वारा आंतरराष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धे करिता भारतीय संघाची निवड चाचणी दिनांक 14 व 15 सप्टेंबर रोजी रायपूर, छत्तीसगड येथे आयोजित करण्यात आली होती, या निवड चाचणी मध्ये
आर्यन वाघमारे व कार्तिकी मिसाळ या दोन्ही खेळाडूंनी भाग घेऊन राष्ट्रीय निवड चाचणी मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे, तसेच आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ अंतर्गत ब्राझील येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेकरिता भारतीय संघामध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे.
आर्यन वागमारे खेळाडूला + 73 kg पुरुष वजन गटा मध्ये सुवर्णपदक मिळाले आहे व . कार्तिकी संदीप मिसाळ या खेळाडूला + 68 kg महिला वजन गटा मध्ये सुवर्णपदक मिळाले आणि सदर दोन्ही खेळाडू ब्राझील येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेकरिता यांची निवड झालेली आहे. आर्यन चे प्रशिक्षक राहुल भवर, कार्तिकी चे प्रशिक्षक अविनाश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली ते खेळाडू सराव करत होते.
सदर दोन्ही खेळाडू सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) चे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, नीरज बोरसे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश करा, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारी सदस्य सतीश खेमसकर, अजित घाडगे तसेच त्यांच्या आई-वडिलांनी अभिनंदन केले आहे.
ब्रेकिंग
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे खेळाडू आर्यन वाघमारे व कार्तिकी मिसाळ यांची ब्राझील येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेकरिता निवड
RELATED ARTICLES






