Homeक्रीडामुंबई महापौर चषक नेटबॉल स्पर्धा 2026 करिता नोंदणीला सुरुवात

मुंबई महापौर चषक नेटबॉल स्पर्धा 2026 करिता नोंदणीला सुरुवात

प्रतिनिधी मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मुंबई महापौर चषक नेटबॉल स्पर्धा २०२६” या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील संघांची नोंदणी सुरू झाली आहे.

ही स्पर्धा दि. 20 जुलै 2026 रोजी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अंधेरी (प.), मुंबई येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. मुंबईतील नेटबॉल खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी तसेच उच्च दर्जाच्या स्पर्धात्मक वातावरणात खेळण्याची ही सुवर्णसंधी आहे.

स्पर्धेत 16 वर्षांखालील मुलगे व 16 वर्षांखालील मुली या गटांमध्ये सामने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट क्रीडा सुविधा, व्यावसायिक आयोजन, थेट समालोचन, छायाचित्रण व व्हिडिओग्राफी, थेट प्रक्षेपण (Live Streaming), ट्रॉफी, पदके, प्रमाणपत्रे तसेच इतर आकर्षक सुविधा उपलब्ध असतील.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, क्रीडा संस्था व नेटबॉल संघांनी आपल्या संघांची नोंदणी लवकरात लवकर करून या मानाच्या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

स्पर्धेचा तपशील
स्पर्धा : मुंबई महापौर चषक नेटबॉल स्पर्धा 2026
दिनांक : 20 जुलै 2026
स्थळ : अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अंधेरी (प.), मुंबई
वयोगट : 16 वर्षांखालील मुलगे / मुली
नोंदणी : सुरू
संपर्क : 9892092939

RELATED ARTICLES

Most Popular