मुंबई प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मुंबई महापौर चषक डॉजबॉल स्पर्धा २०२६” या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील संघांची नोंदणी सुरू झाली आहे.
ही स्पर्धा दि. २१ व २२ जुलै २०२६ रोजी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अंधेरी (प.), मुंबई येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. मुंबईतील डॉजबॉल खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी तसेच दर्जेदार स्पर्धात्मक वातावरणात खेळण्याची ही सुवर्णसंधी आहे.
स्पर्धेत विविध वयोगटातील मुलगे व मुलींचे सामने होणार असून, उत्कृष्ट खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेदरम्यान व्यावसायिक आयोजन, उत्कृष्ट क्रीडा सुविधा, थेट समालोचन, छायाचित्रण व व्हिडिओग्राफी, थेट प्रक्षेपण (Live Streaming), ट्रॉफी, पदके, प्रमाणपत्रे तसेच इतर आकर्षक सुविधा उपलब्ध असतील.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, क्रीडा संस्था व डॉजबॉल संघांनी आपल्या संघांची नोंदणी लवकरात लवकर करून या मानाच्या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेचा तपशील
स्पर्धा : मुंबई महापौर चषक डॉजबॉल स्पर्धा २०२६
दिनांक : २१ व २२ जुलै २०२६
वयोगट : १४ वर्षांखालील मुलगे व मुली / वरिष्ठ (Senior) मुलगे व मुली
स्थळ : अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अंधेरी (प.), मुंबई
नोंदणी : सुरू
संपर्क : ९८९२०९२९३९
टीप : या स्पर्धेसाठी फक्त मुंबई उपनगर जिल्ह्यातील संघांनाच प्रवेश दिला जाईल. इतर जिल्ह्यातील संघांची नोंदणी स्वीकारली जाणार नाही.






