प्रतिनिधी गोंदिया: डीजीएम तायक्वांदो स्पोर्टस एज्युकेशन अँड युथ अकादमी द्वारा दिनांक 18, 19 जुलै 2026 रोजी गोंदिया येथे विदर्भ कप ओपन तायक्वांदो स्पर्धा 2026 च्या आयोजन करण्यात आलेले आहेत, सदर स्पर्धेचे आयोजन चिल्ड्रन, सब ज्युनिअर, कॅडेट ज्युनिअर व सीनियर मुले- मुली या गटामध्ये होणार आहे, अनेक वर्षाच्या नंतर गोंदिया शहरामध्ये भव्य स्वरूपात विदर्भ कप तायक्वांदो स्पर्धा आयोजित होत असल्याने शहरातील खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे, सदर स्पर्धेत गोंदिया, भंडारा चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर यवतमाळ, अमरावती, अकोला व वासिम इत्यादी जिल्ह्यांचे संघ सहभाग होणार आहेत, या स्पर्धे मध्ये तायक्वांदो असोसिएशन महाराष्ट्राचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार असून जिल्ह्यात खेळाच्या वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे, सदर स्पर्धेत जिल्हा सह विदर्भातील खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहेत.






