Homeआंतरराष्ट्रीयपुलगाव येथील खेळाडूंची आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी.....३ सुवर्ण व ५ रजत...

पुलगाव येथील खेळाडूंची आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी…..३ सुवर्ण व ५ रजत पदकांची घवघवीत कमाई

प्रतिनिधी | पुलगाव : नेपाळ युथ स्पोर्ट डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या वतीने दिनांक ३ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२५–२६ चे आयोजन पोखरा शहर, नेपाळ येथे करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत भारतासह विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता,
या स्पर्धेत पुलगाव येथील तायक्वांदो खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि विविध वजन गटांमध्ये यश संपादन करत ३ सुवर्ण व ५ रजत पदके मिळवून पुलगाव शहराचा नावलौकिक वाढविला.
महिला गटातील पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत :
स्वानंदी ढोक – सुवर्णपदक,
वैधवी नीतनवरे – रजतपदक,
स्वरा ढोक – रजतपदक,
रोशनी खराडे – रजतपदक.
पुरुष गटातील पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत :
प्रणव गुडधे – सुवर्णपदक,
निशांत ढोणे – सुवर्णपदक,
सार्थक नितनवरे – रजतपदक,
आरुष खराडे – रजतपदक.
अशा प्रकारे पुलगावच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत एकूण ३ सुवर्ण व ५ रजत पदकांची घवघवीत कमाई करून देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल केले आहे.
या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून श्री. श्याम खेमस्कर यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी शिस्तबद्ध सराव, तांत्रिक कौशल्य व आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश प्राप्त केले.
या यशाबद्दल विजेत्या सर्व खेळाडूंचे, त्यांच्या आई-वडिलांचे, प्रशिक्षकांचे तसेच क्रीडाप्रेमी नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. पुलगाव परिसरात या यशामुळे आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक यश संपादन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular