Homeक्रीडाअकोट येथील सेंट पॉल्स स्कूलच्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी १...

अकोट येथील सेंट पॉल्स स्कूलच्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी १ सुवर्ण व १ रजत पदकांची कमाई.

प्रतिनिधी अकोट : येथील सेंट पॉल्स स्कूलच्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी १ सुवर्ण व १ रजत पदकांची कमाई..

नेपाळ युथ स्पोर्ट डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या वतीने दिनांक ३ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२५–२६ चे आयोजन पोखरा शहर, नेपाळ येथे करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत भारतासह विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत अकोट येथील तायक्वांदो खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि यश संपादन करत १ सुवर्ण व १ रजत पदके मिळवून अकोट शहराचा नावलौकिक वाढविला.
पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत :
चेतन शरद घुगे – सुवर्णपदक,
वेदांत श्रीकृष्ण काकड – रजतपदक,

अशा प्रकारे अकोट येथील सेंट पॉल्स अकॅडेमी च्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत १ सुवर्ण व १ रजत पदकांची घवघवीत कमाई करून देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल केले आहे.
या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून श्री. अनुप बाळासाहेब चांदणे यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी शिस्तबद्ध सराव, तांत्रिक कौशल्य व आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश प्राप्त केले.
या यशाबद्दल विजेत्या सर्व खेळाडूंचे, त्यांच्या आई-वडिलांचे, संस्थेचे अध्यक्ष नवनीतजी लखोटिया व उपाध्यक्ष प्रमोदजी चांडक , प्राचार्य विजयजी बिहाडे, प्रशिक्षकांचे तसेच क्रीडाप्रेमी नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. अकोट परिसरात या यशामुळे आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक यश संपादन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular