जिल्हा प्रतिनिधी गोंदिया: मौजा बोंडगाव/देवी येथे जिल्हास्तरीय अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या खेळाडू व कलाकारांनी क्रीडा तसेच सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धकांनी दाखवलेली मेहनत, कौशल्य, संघभावना आणि खेळाडूवृत्ती विशेष उल्लेखनीय होती.
या महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभास जिल्हा परिषद गोंदिया चे अध्यक्ष लेखराम भेंडारकर हे उपस्थित होते. यावेळी विजयी संघ व स्पर्धकांना पारितोषिक, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला, विजेत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आत्मविश्वास पाहण्यासारखा होता.
बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमात डॉ. प्रशांत पडोळे खासदार भंडारा–गोंदिया, राजकुमार बडोले आमदार तथा माजी मंत्री,सुरेश हर्षे उपाध्यक्ष जि.प., हेमंत पटले माजी आमदार, डॉ. लक्ष्मण भगत सभापती अर्थ व बांधकाम, पोर्णिमा ढेंगे सभापती महिला व बालकल्याण, एम. मुरुगानंथम मुख्य कार्यकारी अधिकारी, आम्रपाली डोंगरवार सभापती पं.स. अर्जुनी/मोरगाव, मुनेष रहांगडाले सभापती पं.स. गोंदिया, चित्रलेखा चौधरी सभापती पं.स. गोरेगाव, चेतन वडगाये सभापती पं.स. सडक/अर्जुनी, योगिता पुंड सभापती पं.स. आमगाव, संजय टेंभरे जि.प. सदस्य, सविता पुराम जि.प. सदस्य, यशवंत गणविर जि.प.सदस्य, निशा तोडासे जि.प. सदस्य, हनवंत वट्टी जि.प. सदस्य, अंजली अटरे जि.प. सदस्य, लक्ष्मी तरोणे जि.प. सदस्य, वैशाली पंधरे जि.प. सदस्य, उषाताई शहारे जि.प. सदस्य, वंदना काळे जि.प.सदस्य, किरणकुमार पारधी जि.प. सदस्य, जयश्री देशमुख जि.प. सदस्य, कविता रंगारी . जि.प. सदस्य, संदिप कापगते उपसभापती पं.स.अर्जुनी, सुनंदा उके उपसभापती पं.स. आमगाव, चंद्रशेखर ठवरे माजी जि.प. अध्यक्ष, प्रतिमा बोरकर सरपंच, कावळेजी पं.स. सदस्य गोंदिया, होगराज पुस्तोडे पं.स. सदस्य, धम्मपाल वालदे , किशोर तरोने माजी जि.प. सदस्य, कमल पाउलझगडे माजी जि.प. सदस्य, राधेश्याम झोळे, विशाल डोंगरे शिक्षणाधिकारी (प्राथ.), मंगला रामटेके, पतिराम मेश्राम, योगेश चौधरी, सरनागतजी, व इतर मान्यवर आणि गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षकवर्ग व विद्यार्थी–विद्यार्थिनी आणि खुप मोठ्या संख्येने महिला व गावकरीमंडळी उपस्थित होते.







