गोंदिया जिल्हा प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्रालय अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया येथे वीर बाल सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सदर कार्यक्रमात तायक्वांदो खेळाचे थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रजत पथक प्राप्त कुमार कुंजन डोये व माधुरी थेर यांना वीर बाल सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले, त्याचबरोबर कुमार बादल कटरे व कु. पूर्वा लोथे यांना सुद्धा वीर बाल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून धोटे मॅडम उपस्थित होते, प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ फोरमेन श्री श्रीगिरीवार, कार्यक्रम संयोजक श्रीरामटेके, श्री सावलाणी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच सूत्रसंचालन श्री नांदगाये तर प्रस्ताविक कुमारी काशीद, यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ कुर्वे यांनी केले. कार्यक्रमात प्रशिक्षण संस्थेचे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
ब्रेकिंग
आंतरराष्ट्रीय खेळाडू कुंजन डोये व माधुरी थेर यांना वीरबाल सन्मान
RELATED ARTICLES






