गोंदिया: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया अंतर्गत डीजीएम तायक्वांदो स्पोर्टस एज्युकेशन अँड युथ अकॅडमी व गोंदिया जिल्हा तायक्वांदो असोसिएशन, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी तायक्वांदो व आत्मरक्षा प्रशिक्षण शिबिर 2026 चे आयोजन स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था फूलचूर पेठ गोंदिया येथे दिनांक 26 एप्रिल ते पाच मे 2026 यादरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे, सदर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूवृत्ती निर्माण करणे, विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होणे, खेळाच्या माध्यमातून त्यांचा आत्मवनोबल वाढवणे, मुलींकरिता स्वतःच्या संरक्षणाकरिता स्वतः तयार होण्याकरिता विविध संरक्षणाचे डावपेच शिकने, खेळाविषयीची माहिती विद्यार्थ्यांमध्ये होणे तसेच विविध क्रीडा क्षेत्राच्या शासकीय योजनांची माहिती खेळाडूंमध्ये निर्माण होणे इत्यादी प्रकारच्या उद्देश प्रशिक्षण शिबिर समोर ठेवून आजपासून प्रशिक्षण शिबिराला सुरुवात होत आहे, सदर शिबिरामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भोजराज चौधरी तसेच तायक्वांदो खेळाचे गोंदिया जिल्ह्याचे जनक तसेच आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक व रेफरी दुलीचंद मेश्राम यांनी केले आहे.






