गोंदिया: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया, गोंदिया जिल्हा तायक्वांदो असोसिएशन व डीजीएम तायक्वांडो स्पोर्ट्स अकॅडमी गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी तायक्वांदो क्रीडा प्रशिक्षण शिबिर 2025-26 चे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था फुलचुरपेठ, गोंदिया येथे दिनांक 26 एप्रिल ते 05 मे 2026 यादरम्यान आयोजित करण्यात आलेले होते. सदर प्रशिक्षण शिबिराचे सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनकरिता दिनांक 08 मे 2026 रोजी प्रमाणपत्र वितरण सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी भोजराज चौधरी, अतिथी म्हणून महाराष्ट्र शासन द्वारा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते तथा जिल्हा सचिव, गोंदिया जिल्हा तायक्वांदो असोसिएशन दुलीचंद मेश्राम, परंपरागत युवा क्रीडा व खेळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय बिरणवार इत्यादी मान्यवर प्रमाणपत्र वितरण सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी भोजराज चौधरी यांनी उपस्थित सर्व खेळाडू व पालक वर्ग यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की राज्य व केंद्र सरकार खेळासाठी विविध प्रकारचे क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिला आहे याचा फायदा खेळाडूंनी घ्यावा तसेच गोंदिया जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे व जिल्ह्याच्या नावलौकिक करावे अशा प्रकारचे आवाहन सुद्धा केले, तसेच उपस्थित सर्व अतिथींनी सुद्धा मार्गदर्शन केले, प्रशिक्षण शिबिरात किमान 100 खेळाडूंचा सहभाग झालेला होता, या सहभागी सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा सचिव दुलीचंद मेश्राम यांनी केले, संचालन प्रशिक्षक कुसुम पटले यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुंजन डोये यांनी केले, यशस्वीते करिता सरगम वाघाडे, आदिती ब्रह्मपुरे, हिमांशू नाईक, पूर्वान्स राऊत, राहुल खोब्रागडे इत्यादींनी सहकार्य केले.







